Fri Jul 04 10:07:05 IST 2025
अलेप्पो : सीरिया सैन्याने चार वर्षानंतर अलेप्पो शहरावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 च्या सुमारास जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. ज्यांनी दहशतवादाविरोधात आपलं योगदान दिलं त्या सर्वांचा हा विजय आहे, असं सीरियाचे राष्ट्रपती बाशर-अल-असद म्हणाले. त्यांनी चीन आणि रशियाचा विशेष उल्लेख केला. यासोबत अलेप्पो, होम्स, हमा, दमिश्क आणि लताकिया या पाच शहरांवर सीरिया सरकारने पूर्णपणे ताबा मिळवला आहे.
राष्ट्रपती बाशर-अल-असद आणि त्यांच्या सहकार्यांसाठी हा मोठा विजय आहे. दरम्यान, रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या मदतीने अध्यक्ष बाशर-अल-असद यांनी हा विजय मिळविला असं मानलं जात आहे.