अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हिंदू असू शकतो : ओबामा

2017-01-20 08:29:52.0
img

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांचा दुसरा कार्यकाळ 20 जानेवारीला संपणार आहे. त्यापूर्वी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले एक दिवस अमेरिकेचा अध्यक्ष हा हिंदू असू शकतो.

या देशाने गुणवतेच्या आधारे सर्वांना संधी दिली आहे. कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाचे गुणवत्ता प्राप्त लोक अमेरिकेची ताकद आहे. भविष्यात अमेरिकेला केवळ महिला राष्ट्राध्यक्षच नव्हे तर हिंदू, लॅटीन, ज्यू राष्ट्राध्यक्षही मिळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना ओबामा भावूक झाले होते. यावेळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व अमेरिकन नागरिकांच्या मनाला स्पर्श होईल, असे भाषण करण्याचा ओबामांनी प्रयत्न केला. विकिलिक्सला संवेदनशील दस्तावेज देणा-या चेल्सिया मॅनिंग यांची शिक्षा कमी केल्याच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं आहे. मी रशिया आणि इतर देशांना आण्विक शस्त्रास्त्रे कमी करण्यासंदर्भात केलेल्या प्रचाराला आणि प्रयत्नाला यश आल्याचंही समाधान त्यांनी व्यक्त केलं आहे. जगाच्या हितासाठी अमेरिका आणि रशियाचे संबंध सुधारणे गरजेचे आहे, असंही मत बराक ओबामांनी मांडलं आहे.

संरक्षण, अणू ऊर्जासाठी सहकार्य करुन संयुक्तरित्या पुनरावलोकन करण्यात आले, शिवाय दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला', याबाबत ओबामा यांनी मोदींना फोनवरुन संपर्क साधून त्यांचे आभार मानले. 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी बराक ओबामा यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. या अविस्मरणीय क्षणांची आठवण काढून ओबामा यांनी मोदींना येणा-या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

Related Post