Fri Apr 04 06:55:33 IST 2025
कटक : अनुभवी युवराज सिंगने गुरुवारी केलेली १५० धावांची खेळी ही १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
युवराज म्हणाला, कदाचित ही माझ्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. यापूर्वी मी २०११ च्या विश्वकप स्पर्धेत शतक झळकावले होते. आजच्या शतकी खेळीमुळे आनंद झाला. आम्ही भागीदारी करण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्यामुळे जोखीम न पत्करता खेळण्याचा प्रयत्न केला.
मी संजय बांगरसोबत चर्चा केली होती. मी मोठे फटके खेळणार असल्याचे त्यांना सांगितले होते. पाच क्षेत्ररक्षकांच्या नियमाचा लाभ घेतला. पहिल्या १० षटकांनंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चांगले सहकार्य लाभले.