ओबामाच्या कायद्या विरोधात आदेश

2017-01-22 09:02:51.0
img

अमेरिका : अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी माजी अध्यक्ष बराक ओबामा प्रशासनाने लागू केलेल्या ओबामाकेअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्याच्या विरोधात आदेश जारी केले.

ओबामा यांच्या प्रशासनाने रुग्णांना सवलतीत आरोग्यसेवा देण्यासाठी पेशंट प्रोटेक्शन अँड अफोर्डेबल केअर अ‍ॅक्ट नावाने कायदा संमत केला होता. त्याचा अमेरिकेतील २ कोटी नागरिकांना फायदा मिळत होता. ओबामाकेअर नावाने हा कायदा प्रसिद्ध होता. मात्र ट्रम्प यांना हा कायदा म्हणजे युरोपीय देशांच्या धर्तीवरील समाजवादी कल्याणकारी कायदा वाटत होता.

त्यामुळे सरकारी तिजोरीवर विनाकारण ताण पडत असल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळे सत्तेत आल्यावर तो रद्द करण्याची घोषणा त्यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळीच केली होती. शुक्रवारी अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी पहिला आदेश काढला तो हा कायदा रद्द करण्याचा. त्यानुसार आता अमेरिकी काँग्रेसमध्ये त्याची अधिकृत प्रक्रिया सुरू होईल.

Related Post