नदालचा संघर्षपूर्ण विजय

2017-01-22 10:02:27
img

मेलबर्न : स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याला आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत शनिवारी जर्मनीचा युवा खेळाडू अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेवविरुद्ध विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. महिला गटात अमेरिकेची टेनिस तारका सेरेना विल्यम्सने अंतिम १६ मधील आपला प्रवेश निश्चित केला.

नदालने टेनिस खेळातील भविष्य म्हणून गणला जाणारा १९ वर्षीय ज्वेरेव याच्यावर ४ तासांपर्यंत रंगलेल्या चुरसपूर्ण लढतीत ४-६, ६-३, ६-७, ६-३, ६-३ असा विजय मिळविला. या विजयामुळे ३० वर्षीय नदालदेखील अनुभवी रॉजर फेडररसह अंतिम १६ मध्ये पोहोचला आहे. नदाल चौथ्या फेरीत फ्रान्सच्या गेल मोंफिल्सशी दोन हात करील.

२०१६च्या अखेरीस झालेल्या दुखापतीमुळे विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सेरेनाला आता चांगलाच सूर गवसला असून, तिचे स्टेफी ग्राफच्या ओपन युगाच्या रेकॉर्डकडे लक्ष आहे. सेरेनाची लढत बार्बरा स्ट्राइकोव्हा हिच्याशी होईल. बार्बरा हिने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया हिचा ६-२, ७-५ असा पराभव केला. सामन्यानंतर सेरेनाने स्ट्राइकोव्हाविरुद्ध लढण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला.

priligy in islamabad - 2025-07-03 20:41:54
100mg clomid any advice or success Generic Benicar 20 Mg stories Marie Thu, Jun 04 Been ttc for 3 years with no success have recently been diagnosed with pcos and really hoping this works I

Related Post