Tue Dec 16 08:09:29 IST 2025
नवी दिल्ली : केंद्र शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी ३५० कोटींची वाढ केली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी क्रीडा मंत्रालयासाठी १९४३ कोटींची तरतूद केली आहे.
मागच्या वर्षी ही रक्कम १५९२ कोटी होती. भारतीय खेळाडू २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा तसेच आशियाडच्या तयारीत व्यस्त असताना क्रीडा बजेट ३५० कोटींनी वाढविण्यात आले. भारतीय क्रीडा प्राधिकरणालादेखील ४८१ कोटी मिळाले. गतवर्षी ही रक्कम ४१६ कोटी होती. दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भरघोस वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना देण्यात येणाऱ्या अनुदानात १८५ कोटींची वाढ करीत ३०२ कोटी रुपये करण्यात आले.
पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी गतवर्षीच्या १३१.३३ कोटींच्या तुलनेत यंदा १४८.४ कोटी रुपये राखीव ठेवण्यात येऐणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मागच्या वर्षीइतकेच ७५ कोटी, राष्ट्रीय सेवा योजनेसाठी १४४ कोटी ठेवण्यात आले तर, राष्ट्रीय क्रीडा विकास निधीतील पाच कोटींची तरतूद कमी करीत दोन कोटींवर आणण्यात आली.