Tue Dec 16 08:15:45 IST 2025
कुवेत : अमेरिकेपाठोपाठ कुवेतनेही पाच मुस्लिम राष्ट्रामधीला नागरिकांना आपल्या देशात येण्यावर बंदी केली आहे. यामध्ये मुख्यत: पाकिस्तानचा समावेश आहे.
कुवेतने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधील नागरिकांना व्हिसा देणे थांबविले आहे. कुवेतमध्ये कट्टरपंथीय इस्लामी दहशतवाद्यांनी हात-पाय पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून कुवेतने प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात सीरिया, इराण, इराक, सुदान, लिबिया, येमेन आणि सोमालिया या राष्ट्रांतील नागरीकांना प्रवेशबंदी करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली होती.