नितीन गजभिये व चंद्रबोधी पाटील श्रीलंका येथे आमंत्रित

2017-05-08 22:31:29.0
img

नागपूर : बुद्ध स्पिरिच्युअल पार्कचे संस्थापक नितीन गजभिये व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील हे १२ ते १४ मे रोजी श्रीलंका येथे होत असलेल्या 'आंतरराष्ट्रीय वेसक दिन' (वैशाख पौर्णिमा ) कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेसक महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.

युनाइटेड नेशन व श्रीलंका यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित वेसक महोत्सवात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषद होत असून, यात शंभर देशातील चारशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. श्रीलंका येथे पंचवीस वर्षानंतर १४ वा वेस्क दिन (वैशाख पौर्णिमा ) साजरा करण्यात येत आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चासत्रे होतील.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचीही कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती राहील. चीन, थायलँड, ब्रह्मदेश, कंबोडिया, जपान, दक्षिण कोरिया, भारत आदी देशातील विविध मान्यवर व भिक्खू कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

Related Post