बंदूकीचा धाक दाखवून गर्लफ्रेंडने नवरदेवाला पळवले

2017-05-17 18:35:42.0
img

हमीरपूर : येथे लग्नसमारंभ सुरू असतानाच बंदूक घेऊन मंडपात दाखल झालेल्या एका तरूणीने चक्क नवरदेवाला पळवल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. ही घटना घडली तेव्हा नवरदेव-नवरीने एकमेकांना वरमाळाही घातल्या होत्या. आद्याप या नवरदेवाचा शोध लागला नसून, पोलीस तरूणी आणि नवरदेवाचा शोध घेत आहेत.

दोन वर्षांपासून दोघांचे प्रमेसंबंध होते असे सांगण्यात येत आहे. नवरी मात्र अद्याप या धक्क्यातून सावरलेली नाही. ही घटना हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा येथे घडली. 15 मे रोजी सियाराम यांची मुलगी चंदा (दोन्ही नावे बदललेली आहेत)चे बांदा जिल्हातील रहिवाशी असलेल्या रामहेत यादव यांचा मुलगा अशोकशी लग्न होणार होते. ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वरात आली, नवरदेव- नवरीने एकमेकाना फुलमाळा घातल्या. त्यानंतर सात फेरे घेण्यास सुरूवात झाली. एवढ्यात अचानक लग्नमंडपाजवळ सिनेस्टाईल वाहनांचा ताफा येऊन धडकला. त्यातून गुंडांची टोळी हातात हत्यार घेऊन उतरले. त्यांचे नेतृत्व करणारी एक तरूणी दबंग स्टाईलने हातात बंदूक घेऊन उतरली आणि थेट लग्न मंटपात पोहोचली. तिने हातातील बंदूकीच्या जोरावर सोबत असलेल्या गुंडांच्या मदतीने नवरदेव अशोकला फरफटत लग्नमडपातून बाहेर नेले आणि गाडीत बसवून फरार झाली. ही घटना घडल्यानंतर नवरी अद्याप धक्क्यातून सावरलेली नाही.

नवरदेवाला पळवणारी तरूणी बांदा येथे नोकरी करत होती आणि मध्य प्रदेशच्या छतरपूर येथली रहीवाशी आहे. तीचे अशोकसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अशोकही बांदा येथेच नोकरी करत आहे. दोघांनी कोर्ट मॅरेजदेखिल केले होते. परंतु, अशोकच्या परिवाराने जबरदस्ती अशोकचे लग्न ठरवले आणि हेच त्याच्या गर्लफ्रेंडला आवडले नाही. घटनेनंतर चंदाने सांगितले की, हे सर्व कधी आणि कसे घडले हे कळलेच नाही. जर मुलाचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते आणि ही बाब त्यांच्या घरच्यांना माहित होती. तर आमच्यासोबत धोका का केला? असा प्रश्नही तीने विचारला आहे

Related Post