Fri Nov 22 04:26:20 IST 2024
नाशिक : दाऊदचे नातलग असलेल्या नाशकातील बड्या असामीच्या पुतणीच्या अाठ दिवसांपूर्वी झालेल्या लग्न सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह तीन स्थानिक आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदारांनी हजेरी लावली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नाची दावत खाणारे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सोमनाथ तांबे यांच्यासह इतर काही पाेलिस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नाशिकचे पाेलिस अायुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी चाैकशी सुरू केली अाहे. आयबी या गुप्तचर संस्थेकडूनही या पाेलिसांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहवाल मागवला आहे.
सहायक आयुक्त सचिन गोरे; वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड; सोमनाथ तांबे; संजय देशमुख; समशेरखान पठाण; मनोज शिंदे; हनुमंत वारे; कांतीलाल चव्हाण; विनोद केदार आणि विजय लोंढे अादींचा समावेश अाहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह अंडरवर्ल्डमधील काही बडे लाेकही या साेहळ्यात उपस्थित असल्याचा संशय अाहे. या शाही सोहळ्याचे चित्रीकरण उपलब्ध झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या साेहळ्याचे फाेटाे साेशल मीडियावर काही पाेलिसांनीच पसरवल्यानंतर प्रकरण उघडकीस अाल्याचे सांगण्यात येते. शहर ए खतीब यांच्याकडून अधिकाऱ्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली असल्याची माहिती आहे. जे अधिकारी, कर्मचारी या सोहळ्यास गेले त्यांची चौकशी सुरू आहे अशी माहिती पाेलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.