तुषार भट्टाचार्य आरोपी नाहीच : प्रा. सोमा सेन

शहर प्रतिनिधी 2017-08-08 20:51:07.0
img

नागपूर : गुजरात पोलिसांनी तुषार भटटाचार्य यांचा धावत्या रेल्वेतून अपहरण केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी प्रा. सोमा सेन यांनी आज (ता. 8) पत्रकार परिषदेत केला. ते विचारवंत व अभ्यासक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमा यांनी सांगितले कि तुषार भट्टाचार्य १५ दिवसांपूर्वी आपल्या बहिणीला भेटायला कोलकात्ता येथे गेले होते. ते परत येताना गुजरात पोलिसांनी त्यांना गोंदिया रेल्वे स्थानकावर मंगळवार (८ ऑगस्ट) रोजी सकाळी अटक करून त्यांना डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अहमदाबाद येथे नेले. २०१० वर्षी १२१ (अ) या गुन्ह्याखाली गुजरात पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले होते. मात्र त्यावेळी ते आंध्रप्रदेश येथील चेरलापल्ली कारागृहात बंदिस्त होते. गुजरात पोलिसांनी फरार घोषित केल्याचे कळताच त्यांनी पत्रद्वारे चेरलापल्ली कारागृहात बंदिस्त असल्याचे कळविले.

चेरलापल्ली कारागृहातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर त्यांच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती. नागपुरातील घरी राहून तुषार भट्टाचार्य विविध सांस्कृतिक व इतरही कार्यक्रमात सहभागी होत होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे नागपूरात वास्तव्य होते. यामुळे त्यांना फरार घोषित करुन गुजरात पोलिसांनी अश्याप्रकारे कारवाई करणे चुकीचे असल्याचे प्रा. सेन यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ता विरा साथिदार पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Related Post