Fri Apr 04 06:53:59 IST 2025
कन्हान : कन्हानवरून आठ कि.मी अंतरावर असलेल्या गोंडेगाव येथील युको बँकमध्ये पाच दरोडेखोरानी सशस्त्र दरोडा घातला. या दरोड्यात त्यांनी अदाजे सात लाख रुपये लुटून ते पसार झाले. कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
कन्हान हे संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाते़ गुन्हेगारीचे स्थान म्हणून कदान्कदा चर्चेत असणारे कन्हान असुरक्षित असल्याचे या दरोड्याने सिद्ध केले आहे़ या घटनेची माहिती नागपूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले़ आज शुक्रवार रोजी नेहमीप्रमाणे बँकेचे व्यवहारिक कार्य सुरू असताना अचानक काही दरोडेखोर फिल्मीस्टाईलमध्ये बँकेत शिरले आणि बंदूक आणि चाकुचा धाक दाखवत भीती निर्माण करण्यासाठी बँकेतील कर्मचाºयाला मारहाण केली़ दरम्यान, कर्मचाºयाला कानाजवळ हलका मार लागला आहे़ महिला कर्मचाºयाच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली़ दरोडेखरांमध्ये पाच जणांचा समावेश असल्याची माहिती आहे़ ज्यामध्ये दोन दरोडेखोर हे बंदूक घेऊन आणि इतर चाकूसारखे हत्यार घेऊन होते.
दरोडा टाकल्यानंतर आपण सीसीटीव्हीमध्ये येऊ, या भीतीने त्यांनी संपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा हेतूने सीसीटीव्ही हार्डडिस्कसुद्धा पळवून नेली़ तपासाचा पोलिसांसमोर पेच निर्माण झाला़ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, पोलीस उपविभागीय अधीकारी ईश्वर कतकडे, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर, फिंगर प्रिंट एक्स्पर्ट व डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.