Fri Nov 22 04:05:04 IST 2024
नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तब्बल 9 वर्ष तुरूंगात असलेले कर्नल पुरोहित यांना काँग्रेस सरकारने जाणूनबुजून फसविले होते. तेव्हा काँग्रेस सरकारने यासाठी पोलीस बळाचा वापर केल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार व माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी केला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने पुरोहित यांना जामीन मंजूर केला. या पार्श्वभुमीवर सत्यापाल सिंग हे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सत्यपाल म्हणाले, कर्नल पुरोहित यांच्या विरोधात राजकीय षड्यंत्र रचण्यात आले होते. राजकीय कारणामुळेच त्यांना अटक करण्यात आली. कॉंग्रेसने मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोटात पोलिसांचा वापर केला.
कॉंग्रेस सरकारने पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला होता. कॉंग्रेसने आपल्या हितासाठी यंत्रणांचा वापर केला, त्यामुळेच पुरोहित यांना अटक झाली होती असा घणाघात सत्यपाल यांनी कॉंग्रेसवर केला आहे.