Sun Sep 14 06:24:58 IST 2025
वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला आहे.
देशाला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, "पाकिस्तान सातत्याने अराजकता, हिंसा आणि दहशतवादाच्या एजंटांना सुरक्षित आश्रय देत आहे. हे सहन करू शकत नाही. हा धोका अजून वाढला आहे, कारण भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमधील तणावाची परिणती संघर्षात होण्याची शक्यता आहे. " पाकिस्तानवर हल्लाबोल करताना ट्रम्प पुढे म्हणाले, "आम्ही पाकिस्तानला लाखो डॉलर रुपयांची मदत करत आहोत, आणि त्याच्या मोबदल्यात ते काय देतात, तर आम्ही ज्या दहशतवादाविरोधात लढत आहोत त्या दहशतवादाला पाक आश्रय देत आहेत. "
अफगाणिस्तानवर आपल्या धोरणासंदर्भात ट्रम्प म्हणाले, आपल्यात आपसात शांतता नसेल तर आपण जगातील शांतता कायम राखणारी शक्ती बनून राहू शकत नाही. घाई गडबडीत अमेरिकेने अफगाणिस्तानातून फौजा हटविल्यास तेथील परिस्थिती शून्यावर येईल. तिथे लगेच इसिस आणि अल कायदाचे दहशतवादी कब्जा करतील. अफगाणमधील परिस्थिती पाहून आपले नवे धोरण निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले.