Fri Nov 22 03:06:22 IST 2024
नागपूर : रेनो हा भारतामधील पहिल्या क्रमांकाचा युरोपीय ब्रँड असून अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह नवीन कायगर मॉडल ईयर 22 लॉन्च करण्यात आली, जिची किंमत नागपुरात रू. 5.84 लाखापासून सुरू होते. तिची स्पोर्टी, स्मार्ट आणि आकर्षक वैशिष्टे कायगरला भारतामधील रेनोच्या सर्वोच्च पाच जागतिक बाजारपेठांमध्ये चालना मिळवून देतात.
रेनो इंडियाचे हेड सेल्स अँड नेटवर्क शहाल शमसुदिन यांनी नागपुरात रेनो कायगर मॉडल ईयर 22 चे अनावरण केले. फ्रान्स आणि भारतामधील डिझाईन टीमच्या साथीने रेनो कायगरला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. जागतिक पटलावर नेण्यापूर्वीची ही भारतात पहिल्यांदा लॉन्च होणारी ही तिसरी ग्लोबल कार आहे. रेनो कायगर सीएमएफए मंचावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्य घेऊन आली आहे. ज्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण मल्टीसेन्स ड्रायव्हिंग मोड्स, प्रशस्त जागा, केबिन स्टोरेज आणि सामान ठेवण्याच्या जागेसोबत कामगिरी आणि कार्यक्षमतेचे योग्य संतुलन राखले जाणार आहे. एमटी आणि ईजी-आर एएमटी ट्रान्समिशनमधील 1.0एल एनर्जी इंजिन आणि एमटी व एक्सट्रोनिक सीव्हीटी ट्रान्समिशन्समधील 1.0एल टर्बो असे दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. हल्ली सर्वच उत्पादन श्रेणीत गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येते. कायगर मॉडल ईयर 22 पीएम2.5 अॅडव्हान्स अॅटमॉस्फेरीक फिल्टर हे देखील असेच एक वैशिष्ट्य असून त्यामुळे केबिनमध्ये हवेची गुणवत्ता चांगली राहते. अंतर्गत रंगसंगती अधिक भडक वाटू नये म्हणून नवीन रेड फेड डॅशबोर्ड अॅसेंटसह क्वील्टेड एंबॉस सीट अपहोलस्ट्रे सोबत रेड स्टीच कारच्या देखणेपणात भर घालते. गाडी चालवण्याचा अनुभव वृद्धिंगत व्हावा आणि आरामदायक ठरावा यासाठी वायरलेस स्मार्टफोन चार्ज आणि क्रुझ कंट्रोल कार्य हे दोन रंगांमधील मेटल मस्टर्डसह मिस्ट्री ब्लॅक रूफ अशा नवीन रंगसंगतीसमवेतदेखणेपणात भर घालते. रेनो कायगर मॉडल ईयर 22 टर्बो उत्पादन श्रेणीत नवीन टेलगेट क्रोम इन्सर्ट, फ्रंट स्कीड प्लेट, टर्बो डोअर डिकॅल्ससह 40.64 सेमी डायमंड कट अलॉय व्हील्ससह रेड व्हील्स कॅप्स बाह्य सजावट अधिक आकर्षक आणि स्पोर्टी बनवते. भारतात रेनोच्या 10 वर्धापनदिनाचा भाग म्हणून मागील वर्षी कायगर आरएक्सटी (ओ) प्रकार लॉन्च करण्यात आला, त्यात एमटी
आणि एक्स-ट्रोनिक सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये 1.0 एल टर्बो सोबत आकर्षक किंमत उपलब्ध करून देण्यात येते. रेनो कायगरमध्ये भारतीय बाजारांच्या सर्व सुरक्षा गरजांचे अनुपालन करण्यात आले आहे. त्यातही एक पाऊल पुढे नेत प्रवासी आणि पादचारी दोघांच्या संरक्षणाची काळजी घेण्यात आली. अलीकडेच रेनो कायगरला जागतिक स्तरावरील महत्त्वाचा वाहन मूल्यांकन कार्यक्रम, ग्लोबल एनसीएपीकडून 4 स्टार सेफ्टी रेटिंग फॉर एडल्ट ऑक्युपंट सेफ्टी पुरस्कार प्राप्त झाला. चालक आणि पुढे बसलेल्या प्रवाशाची सुरक्षा लक्षात घेता रेनो कायगरमध्ये चार एअरबॅग पुढे आणि मागे सोबतच सीट-बेल्टसह प्री-टेंशीनर आणि लोडलिमीटर (चालकसाठी) देण्यात आले आहे. त्यात सुरक्षा वैशिष्ट्ये म्हणून एबीएससह ईबीडी आणि रिअर पार्किंग सेन्सरचा समावेश आहे. त्यात भर म्हणून कायगरमध्ये इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक, स्पीड सेंडिंग डोअर लॉक, 60/40 स्प्लिट रिअर रो सीट सोबत अॅडजस्ट होणारे हेडरेस्ट आणि आयएसओफिक्स अॅन्करएज चाईल्ड सीटकरिता देण्यात आले आहे. त्याशिवाय, रेनो कायगरने कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये जे. डी. पॉवर 2021 इंडिया इनिशियल क्वालिटी स्टडी (आयक्युसी) मध्ये सर्वोच्च दुसरा क्रमांक प्राप्त केला असून त्याच्या ग्राहकांना सर्वोच्च गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या वचनबद्धतेची खातरजमा प्रतिबिंबित होते. रेनो कायगरला कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ते भारतीय बाजारपेठांमधील यश अधोरेखित करते. कायगर जागतिक दर्जाच्या टर्बोचार्ज 1.0 एल पेट्रोल इंजिनने युक्त असून केवळ दणकट कामगिरी आणि स्पोर्टी देखणेपण उपलब्ध करून देत नाही, तर या सेगमेन्टमधील सर्वोत्तम इंधनस्नेही वाहन आहे, जे एका लिटरमध्ये 20.5 किमी धावते. भारतात 2021 च्या पूर्वार्धात यशस्वी ग्लोबल लॉन्च झाल्यानंतर रेनो इंडियाने नेपाळ, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशियात कायगरची निर्यात सुरू केली, ज्याला लॉन्चपासून भरभरून प्रतिसाद मिळाला.