महिलेचे चुंबन घेतले नाही : डोनाल्ड ट्रम्प

2016-10-10 18:11:01.0
img

सर्व महिलांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. २००५ साली रेकॉर्ड करण्यात आलेला व्हिडिओ म्हणजे खासगी गप्पा होत्या.

त्याबद्दल मी खरच खेद व्यक्त करतो . मी कधीच कोणत्याही महिलेल्या तिच्या परवानगीशिवाय स्पर्श व चुंबन घेतले नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यादरम्यान ?प्रेसिडेन्शियल डिबेट?ची दुसरी फेरी आज पार पडली. या चर्चेदरम्यान दोघांनी एकमेकांवर विविध विषयांवरून निशाणा साधत आरोप - प्रत्यारोप केले.

तसेच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास आगामी योजनाही नमूद केले. या चर्चेच्या एकूण तीन फे-या असून त्यातील दोन फे-या पार पडल्या आहेत. लवकरच तिसरी व निर्णायक अंतिम फेरी पार पडेल. ८ नोव्हेंबर मतदान झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाईल हे स्पष्ट होईल.

Related Post