Fri Nov 22 03:24:50 IST 2024
नागपूर : नागपूरस्थित राइट वॉटर सोल्युशन्सने भारतभरात सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी निधी उभारला आहे. ही गुंतवणूक भारतातील नागपूर विभागात आंतरराष्ट्रीय फंडाने केलेली आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या एफडीआयपैकी एक आहे
पिण्यायोग्य पाणी आणि पाण्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणाऱ्या नागपूरस्थित राइट वॉटर सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला इन्कोफिन इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या वॉटर अॅक्सेस अॅक्सेलरेशन फंड (W2AF) कडून अशा प्रकारची पहिलीच ७.५ दशलक्ष युरोची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. भारतातील तसेच पिण्याच्या पाण्याच्या क्षेत्रातील ही पहिलीच गुंतवणूक आहे. हा उपक्रम भारतातील नागपूर विभागात आंतरराष्ट्रीय निधीद्वारे आतापर्यंत हाती घेतलेल्या सर्वात मोठ्या एफडीआयपैकी एक आहे. राइट वॉटर - इन्कोफिन W2AF भागीदारी भारतातील लाखो लोकांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, शाश्वतता आणि जीवनमानाची गुणवत्ता यात लक्षणीय सुधारणा करण्यासाठी सज्ज आहे. अध्यक्ष श्री विनोद गान यांनी स्थापन केलेली आणि राइट वॉटरचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिजीत गान यांच्या नेतृत्वाखाली राइट वॉटर भारतभरात जिथे पाण्याचे स्त्रोत रासायनिक आणि जैविक दृष्ट्या प्रदूषित होतात अशा ठिकाणी सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसमावेशक, किफायतशीर आणि शाश्वत उपाय प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. मार्च २०२३ मध्ये सादर करण्यात आलेला, वॉटर अॅक्सेस अॅक्सेलरेशन फंड (W2AF) हा सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठीचा पहिला खाजगी इक्विटी फंड आहे. वॉटर अॅक्सेस अॅक्सेलरेशन फंड (W2AF) हा प्रभाव-प्रथम मिश्र फंड असून तो प्रामुख्याने आफ्रिका आणि आशियामध्ये सुरक्षित पेयजल उपक्रमांमध्ये गुंतवणूक करतो. इक्विटी गुंतवणुकीद्वारे, ३६ दशलक्ष युरोच्या एकूण वचनबद्धतेसह २०३० पर्यंत ३० दशलक्ष लोकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे फंडाचे उद्दिष्ट आहे. WZAF च्या गुंतवणूकदारांमध्ये डॅनोन, बीएनपी परिबास, यू.एस. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC), डॅनिश विकास वित्त संस्था आयएफयू, नॉरफंड आणि यू.एस. एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. PwC ही राइट वॉटर सोल्युशन्सची इक्विटी फंड उभारणीसाठीची विशेष आर्थिक सल्लागार होती. जागतिक बँकेच्या मते, खराब पाणीपुरवठ्यामुळे विकसनशील देशांना दरवर्षी सुमारे २६० अब्ज डॉलर्सचे नुकसान होते. असा अंदाज आहे की स्वच्छ पाण्यात गुंतवलेल्या प्रत्येक डॉलरमुळे आरोग्य विषयक खर्चात चार डॉलरची घट होते. जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नाही आणि जगातील ४० टक्के लोकसंख्येला पाणी टंचाईचा फटका बसला आहे. सर्वांसाठी सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही विशेषतः भारतासारख्या देशात सोडवायलाच हवी अशा समकालीन समस्यांपैकी एक आहे. नाविन्यपूर्ण, परवडणारे स्थानिक उपाय या समस्या सोडवण्याची उत्तम संधी देतात. शाश्वत विकास ध्येय (SDG) निकषांशी सुसंगत भारताने ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी UNICEF सोबत भागीदारी केली आहे. जल जीवन मिशन, जल शक्ती अभियान, अमृत २, स्वजल योजना, स्वच्छ भारत मिशन, ?हर घर जल? उपक्रम, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे वॉश उपक्रम इ. प्रत्येक आर्थिक वर्षात सरकारच्या विचारपूर्वक अर्थसंकल्पीय वाटपाद्वारे चालना मिळणारे काही प्रमुख उपक्रम आहेत. राइट वॉटर १५ वर्षांहून अधिक काळ सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सेवेचा विस्तार करण्यासाठी सरकार, महामंडळे आणि स्थानिक प्राधिकरणांसोबत सहयोग करत आहे. कंपनीने संपूर्ण भारतामध्ये ५२०० हून अधिक विशिष्ट तंत्रज्ञानासह शुद्धीकरण युनिट्स आणि प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. कंपनी दररोज १० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया करते आणि त्याद्वारे १२ राज्यांमधील एक दशलक्ष हून अधिक लोकांना आपल्या सुविधेद्वारे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवले जाते. सामुदायिक जल शुद्धीकरण प्रकल्प, इलेक्ट्रो-क्लोरीनेशन प्रकल्प, आर्सेनिक आणि फ्लोराईड आधारित प्रकल्प, सौर उर्जेवर चालणारे पाणी शुद्धीकरण यासारख्या राइट वॉटरच्या काही उल्लेखनीय प्रकल्पांनी पर्यावरणाला कोणतीही हानी न होता स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. काही सामुदायिक जल शुध्दीकरण प्रकल्प महिला बचत गटांद्वारे (SHGs) व्यवस्थापित केले जातात. त्यांना पाणी विक्रीतून उत्पन्न मिळते. या मायक्रोएंटरप्राइज मॉडेलमुळे अशा १५० बचत गटांमधील सुमारे १६५० महिलांना रोजगाराचा लाभ देण्यात तसेच त्यांच्या उपजीविकेला चालना देण्यात मदत झाली आहे. राइट वॉटरमधील चांगली गुंतवणूक भारतातील टियर २ शहरांमधून उदयास येणाऱ्या उद्योगांची क्षमता आणि स्वच्छ पाण्याच्या उपलब्धते सारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. भारताच्या दुर्गम कोपऱ्यातील वगळलेल्या लोकसंख्येला सुरक्षित आणि पोर्टेबल पिण्याचे पाणी सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या ध्येयासह राइट वॉटरचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिजीत गान टिप्पणी करतात की ?पाण्याला समर्पित असा जगातील पहिला फंड असलेल्या इन्कोफिन WZAF सोबतचा सहयोग राइट वॉटरसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे. हे भारतातील टियर २ शहरांमधून उदयाला आलेल्या उद्योगांमधील सुप्त क्षमतेवर प्रकाश टाकते. हा सहयोग ग्रामीण भारतातील लाखो लोकांपर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवून आमची पोहोच वाढवण्यास सक्षम करतो. आम्ही एक शाश्वत सामाजिक उपक्रम तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते केवळ लाखो लिटर सुरक्षित पाणीच वितरीत करत नाही तर ते फायदेशीरपणे करते आणि प्रक्रियेतील सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करते.?
इन्कोफिनच्या व्यवस्थापकीय भागीदार आणि W2AF च्या निधी व्यवस्थापक दिना पोन्स पुढे म्हणाल्या, ?या ऐतिहासिक गुंतवणुकीद्वारे, WZAF आणि राइट वॉटर यांनी भारतातील आणि त्यापलीकडे कमी उत्पन्न असलेल्या लाखो कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी समर्पित धोरणात्मक सहयोग निर्माण केला आहे. आम्ही अत्यंत समर्पित आणि कुशल राइट वॉटर टीमचे त्यांच्या आतापर्यंतच्या अतुलनीय कार्याबद्दल मनापासून कौतुक करतो. एकत्रितपणे, आम्ही २०२८ पर्यंत दररोज ५० दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या समान धारणेवर ठाम आहोत. आम्ही आफ्रिका, भारत, आशियाच्या इतर भागांसारख्या बाजारपेठांमध्ये जल उद्योगांचा उदय पाहिला आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमची पोहोच वाढवू, भूगर्भातील सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान तयार करू. राइट वॉटर ही कंपनी उत्पन्न किंवा स्थान विचारात न घेता सुरक्षित आणि किफायतशीर असे पिण्याचे पाणी प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनीचे नाविन्यपूर्ण उपाय आणि शाश्वततेवर असलेला भर लक्षावधी लोकांच्या जीवनात वास्तविक बदल घडवून आणत आहे. जलसंकट दूर करण्यासाठी राइट वॉटरमधील गुंतवणूक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.