Fri Apr 04 06:58:08 IST 2025
नागपूर : पीएम नरेंद्र मोदी यांच्या खात्यात हजाराहून कमी म्हणजे केवळ 574 रुपये आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत पीएम मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची (Property) घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही जीवन बीमा पॉलिसी (Policy) नाही. त्यांच्या बीमा पॉलिसीची तारीक संपली आहे. विशेष म्हणजे पीएम मोदी यांच्याकडे कोणताही शेअर नाहीए, किंवा म्युच्यूअल फंडमध्ये त्यांची गुंतवणूक नाहीए. इतकंच काय तर पीएम मोदी यांच्या नावावर एकही कार (Four Wheelar) नाहीए.
ही सर्व माहिती प्राइम मिनिस्टर ऑफिसच्या म्हणजे PMO च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. यावर पीएम मोदी यांच्या सर्व संपत्तीची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईवर दिलेल्या माहितीनुसार पीएम मोदी यांच्याकडे सोन्याच्या चार रिंग आहेत, ज्याची किंमत 2,01,660 इतकी आहे. याशिवाय कोणतीही प्रॉपर्टी पीएमच्या नावावर नाहीए.